28/07/2008
२८ ज्ञुलै१९८९: 28 July 1989
२८ जुलै १९८९
२८ जुलै १९८९ रोजीं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मुंबई येथे महापूर आला। त्याचा सर्वात जास्त फटका रांयगडला बसला। त्या पुरांत
एक गाव तर पाण्याखाली गेले।
श्री अरुण शिवकर आणि त्याच्या तरुण साथीदारानी कितीतरी लोकाना सहाय्य केले। आणि बेघर झालेल्या लोकाना आसरा देण्याची सोय केली। मुम्बईहून असंख्य लोकानी हरप्रकारे मदत केली।
पण जेव्हा त्याना पाच वारी साड्यांची मदत आली तेव्हा अरुणने साभारपूर्वक सुचवले की "आमच्या बाया नव वारी साड्या नसतात। शाक्य असल्यास द्याव्या। " तसेच तयार कपड्या ऐवजी कापड आणि शिलाईची मशीने दिली तर बायाना कामही मिळेल हे पण सुचवले। त्यामुळे देगणगीदर प्रसन्न झालेच पण बरोबरच त्यांच्या हे पण लक्षात आले की स्थानिक लोकांच्या गरजांची त्याना कल्पना पण नसते।
अरुण आणि देवळी गावाच्या लोकानी "साकव" नावाची सेवाभावी संस्था सुरु तर केलेली होतीच। ही संस्था पूर्णपणे स्थानिक लोकानी चालवलेली होती। अशा संस्था फार कमीच।
© Remigius de Souza।, All rights reserves.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment