01/04/2011

व्यावसायिकाना रेमीचे सलाम!

व्यावसायिकाना रेमीचे सलाम!

अर्जुनाला पोपटाचा फक्त डोळाच दिसत होता.

व्यावसायिकाना रेमीचे सलाम!

मला अभाग्याला
     डोळा दिसतो.
     पोपट दिसतो.
     फांदी दिसते.
     झाड दिसते.
     जमीन दिसते.
जी देते अन्न-पाणी.
मला दिसते प्रतिबिंब त्याच्या डोळ्यावर
    आकाशाचे
    पाऊस पाडणाऱ्या
    त्याच्या डोळ्यावर प्रतिबिंब दिसते.
डोळ्याच्या आतल्या अंधारात
     चित्र दिसते
     नेत्र पटलावर
     ढगांचे.

अर्जुनाचा तीर सुटला.
पोपट त्याच्या जन्मातून मुक्त झाला.
पण माझे तीर-धनुष्य गळून पडले.
मी माणसाच्या जन्मातून मुक्त झालो नाही.
(मला पुनर्जन्माचे वरदान मिळाले.)
----
बडोदे | नोव्हेंबर १९७०
(इंग्रजी भाषांतर पहा)
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza., All rights reserves. Protected by Copyscape DMCA Copyright Protection

3 comments:

 1. > पण माझे तीर-धनुष्य गळून पडले.

  फारच भाग्यवान आहात तुम्ही!
  आवडली कविता.

  ReplyDelete
 2. सावितादी,
  आपण केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार. अन हे दान सत्पात्री आहे याची पण मी खात्री देतो. याची जाणीव मला शेवट पर्यंत राहो अशी मी माझी मलाच प्रार्थना करतो.
  आपला कृपालोभ राहावा ही विनंती.

  ReplyDelete
 3. सावितादी,
  जयांचे नाते सृष्टीशी जोडले |
  त्यांचे सारे अहंकार लोपले ||
  या कवितेत सृष्टी-दर्शन स्पष्ट आहे. याचे इंग्रजी भाषांतर १६-०४-२००१ ला मी PoetsIndia या वेब साईट वर प्रसिद्ध केले होते. पण लिहिली होती १९७० साली. माझीपण ही आवडती कविता!

  ReplyDelete