नास्तिकाचा प्रवास
सम्भ्रमाच्या जाळ्यातून वृक्षवेलींच्या,
दर्याखोर्यातून, काटेरी रणाच्या उनातून,
कड्यावरून झंझावाती, कपारींतून
अजाणता झाले तीर्थांचे दर्शन॥
मानवतेचे सागर जुमानत नव्हते
जीवन मरणाच्या रेषेवर
उनपाऊस वारा हीव
तयांचा होता स्पर्ष अटळ
वाघा- भेकडांच्या आरोळ्या
आक्रन्दाना पलिकडे
होते अनंत अटल क्षितिजाचे दर्शन॥
ऑगस्ट १९९३
~~~~~
© Remigius de Souza., All rights reserves.
No comments:
Post a Comment