15/09/2008

मातीचा माणूस - मातीचा सुगंध

मातीचा माणूस - मातीचा सुगंध
आधुनिक युगाची कविता

मातीचा माणूस
विसाव्या शतकाच्या अखेरीला
माय चावूनझ राजकारणी लोकांची
पंथास लागलेला।

मातीचा गोळा
त्याचा केला प्याला
साठवली पहिल्या
धारेची नशा त्यात
मध्यरात्रीच्या नि:शब्द सान्निध्यात।

मातीचा गोळा
त्याची केली पणती
त्यात वात पेटवली
मधारात्रीच्या नि:शब्द सान्निध्यात.

मातीचा गोळा माणूस
त्याचा केला
जीव त्यात फुन्करला
नाव त्याचे ठेवले
मातीचा पूत

त्याला पावसात भिजत ठेवला
कुजत ठेवला
ठोकून थोपटून घडवला
उनात त्याला करपला.

माणसाची माती
उंबरठ्यावर
एकविसाव्या शतकाच्या
कधी काळी येईला का त्याला
मातीचा सुगंध?
---
मुंबई
६-३-१९८९
~~~~~~~
© Remigius de Souza., All rights reserves.

No comments:

Post a Comment